नवी दिल्ली: देशात सध्या पर्यावरण हानी अधिक होत आहे. खास करून गाड्यांच्या अति वापरामुळे गाड्यामधून येणाऱ्या धुरामुळे याची पर्यावरण हानी पोहचते तसेच मानव जातीला देखील या धुराचा त्रास होण्याची शक्यता असते. यामुळे सायकल चालवण्यासाठी काहीजण प्रधान्य दिले जात आहे. यातच सध्या पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीत वाढ झाल्याने लोक देखील चिंतेत आहेत. त्यामुळे आता अनेक लोक इलेक्ट्रीक गाड्यांकडे वळताना दिसत आहे.
नागरिकांचा इलेक्ट्रीक स्कूटरचा प्रतिसाद पाहता Corrit Electric भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपली नवी Hover इलेक्ट्रीक स्कूटर याच महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात लाँच करणार आहे. सुरूवातीला ही स्कूटर दिल्लीत लाँच केली जाईल. त्यानंतर मुंबई, बंगळूरू आणि पुणेसारख्या ठिकाणी लाँच करण्यात येईल.
सध्या या स्कूटरचं प्री बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. तसंच ग्राहकांना ११०० रूपयांमध्ये ही स्कूटर बुक करता येईल. या स्कूटर्सची डिलिव्हरी २५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. या स्कूटरचा सर्वाधिक वेग हा २५ किलोमीटर ताशी असल्यानं ही स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही.
विशेष म्हणजे ही स्कूटर प्रामुख्यानं १२ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी आणि गोवा, जयपूरसारख्या शहरांमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. ही स्कूटर लाल, पिवळ्या, निळ्या, गुलाबी, काळ्या रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. ही स्कूटर २५० किलोपर्यंत वजन घेऊ शकते. या स्कूटरमध्ये दोन्ही बाजून डिस्क ब्रेक, ट्युबलेस टायर आणि ड्युअल शॉक अब्झॉर्बर देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची करडी नजर?; पुराव्यासह केला आरोप
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- महाराष्ट्र ‘अंधाराकडे’, लवकर पावलं उचलली नाहीत तर…; माजी उर्जा मंत्र्यांची चिंता
- ‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’
- ‘हा प्रश्न मला विचारू नका’ म्हणत चालू मुलाखतीतून माईक फेकून मलिक निघून गेले

