हाताच्या बोटांना मसाज करणं हा डोकेदुखी थांबवण्याचा एक उपयुक्त इलाज आहे. या उपायामुळे सायटिकाने ग्रस्त रूग्णांनाही आराम मिळतो. डोकेदुखी थांबवण्यासाठी बोटांच्या मधल्या भागात मसाज करावा. अंगठा सोडून आठही बोटांना मसाज करावा. अंगठा आणि तर्जनीच्या मधील भागात दाब द्यावा. बोटाच्या अग्रभागी नखाच्या खाली दाब द्यावा. दाब दोन मिनिटापर्यंतच टिकवून ठेवावा. या दाबामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो. त्याचबरोबर तनामनावरचा ताणही दूर होतो. हा उपाय कुठेही करता येतो.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
