नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय मंगळवारी दिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह नसला तरी आम्ही न्यायालयाचा सन्मान म्हणून हा निर्णय स्विकारून न्यायालयीन समितीसमोर आपले मत ठामपणे मांडू. आंदोलकांनीही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखावा आणि आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन माजी कृषि मंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
केंद्रीय कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासंदर्भात एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या समितीलाही शेतकरी आंदोलकांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी एकामागोमाग एक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
महोदय, हे काय सुरू आहे? आपण काय करत आहोत? सरकारने अहंकार दूर ठेवावा. लोहडीच्या शुभेच्छा देताना एक गोष्ट आवर्जुन लक्षात ठेवावी की, आगीशी खेळण्याची ही वेळ नाही. १३० कोटी जनतेतून निःपक्ष व्यक्ती पॅनलसाठी मिळाल्या नाहीत का?, असा बोचरा सवालही शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
Hon'ble Sir, what's happening, what are we doing? Govt. must shun it's ego & keep arogance apart. While congratulating everyone Happy Lohri, reminding all that it's no time for any Govt to play with fire anymore. Sir, out of 1.3 billion people couldn't we find an impartial
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) January 14, 2021
दुसऱ्या एका ट्विटमध्ये शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की, नवीन समितीवर नेमण्यात आलेली मंडळी वादग्रस्त कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या या ट्विटमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, काँग्रेस नेते शशी थरूर, यशवंत सिन्हा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही टॅग केले आहे.
panelist? Most of the selected panelists were allegedly responsible in making these controversial & feared agricultural laws. It would be highly appreciated if your advisors/people could/would watch this video by senior exec editor NDTVIndia @ravishndtv for remedial measures,
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) January 14, 2021
महत्वाच्या बातम्या
- हे पण आम्हीच केले…औरंगाबादमध्ये रंगली सेना- काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई
- परिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र
- ‘धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा,अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलने करणार’
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे…सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; भरणे यांचे सिद्धरामेश्वरांकडे साकडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

