नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते मुंबई व नांदेड ते पुणे अशा दोन नवीन सुरू करण्याच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये नांदेड ते सीएसएमटी व नांदेड ते पुणे या साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे 26 जानेवारीपासून धावणार आहेत. परंतु, इतर रेल्वेंप्रमाणेच सध्या या दोन्ही विशेष रेल्वेंसाठी आरक्षण आवश्यक असल्याचेही रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.
या दोन रेल्वे सुरू झाल्याने मराठवाड्यातील प्रवाशांना राज्याच्या राजधानीत जाणे सुकर होणार आहे. नांदेड ते सीएसएमटी ही रेल्वे नांदेड येथून मंगळवारी (दि.26) सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी निघणार आहे. ही रेल्वे औरंगाबादेत दुपारी अडीच वाजता पोहोचेल. तर अखेरीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल.
दुसरीकडे, नांदेड ते पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. ही रेल्वे नांदेड येथून मंगळवारी व रविवारी, तर पुणे येथून सोमवारी व बुधवारी धावणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनापरवाना ऊसगाळप केल्याने उस्मानाबादमधील जयलक्ष्मी शुगर्सला 35 लाखांचा दंड
- शरद पवारांचा एक फोन आणि इंडियाचं विमान मुंबईत लँड
- ‘वाटले होते गड्या आपला गाव बरा, पण तुम्ही म्हणले पसारा भरा’, पराभूत उमेदवाराचे अजब बॅनर
- …म्हणून अजूनही व्हॅनिटी व्हॅन मध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे
- गुड न्यूज : जिओने बदलला ‘ हा ‘ रिचार्ज प्लॅन…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
