Share

औरंगाबादकरांसाठी सुखावह बातमी; लवकरच होणार खाम नदीचे लोकार्पण!

Published On: 

औरंगाबाद: शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक खाम नदी पुनरुज्जीवन विकासासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय(Aastik Kumar Pandey) यांनी स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून गेल्या एक वर्षाच्या अथक प्रयत्न व परिश्रमातून खाम नदीला गतवैभवाबरोबरच पर्यावरण पूरक आणि सुशोभीकरण, सौंदर्यीकरण आकर्षक करून बालगोपाल व नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. येत्या २५ जानेवारी २०२२ रोजी या विकास कामाला एक वर्ष पूर्ण होत असल्याने लवकरच खाम नदीचे लोकार्पण होणार आहे.

त्या अनुषंगाने मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी खाम नदीला भेट देऊन विविध कामांची पाहणी करून अधिकारी व कर्मचा-यांना सूचना दिल्या. खाम नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाच्या कामाला येत्या २५ जानेवारी २०२२ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. खाम नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी व सौंदर्यीकरण, पर्यावरण पूरक करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शासनाचा कोणताही निधी न वापरता महानगरपालिका, स्मार्ट सिटी, व्हॅरोक, छावणी परिषद, इको सत्व यांना सोबत घेऊन लोकसहभागातून खाम नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, पिचींग केल्यामुळे या वर्षी दोन-तीन वेळा अतिवृष्टी होऊनही नदीकाठच्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले नाही.

पर्यावरणपूरक अशा देशी व फळ झाडांचा समावेश आहे. पक्ष्यांसाठी आकर्षक निवारा आणि अन्न पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्राणी व पक्ष्यांचा वावर वाढत आहे. खामनदीचा कायापालट होऊन चेहरा मोहरा बदलला असून मनपा प्रशासन अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आता परत यातून हे शक्य झाले असून औरंगाबाद करांसाठी लवकरच खाम नदीचे लोकार्पण होणार आहे. यावेळी शहर अभियंता एस. डी. पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख उपायुक्त सौरभ जोशी, छावणी परिषदेचे विक्रांत मोरे, इको सत्वच्या नताशा झरिन आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!