Share

‘जीवनावश्यक वस्तुच्या वाहनावर ओळखीसाठी स्टीकर लावावेत’

Published On: 

परभणी : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे सुरु राहावा यासाठी लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व वितरण वगळण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडचण होऊ नये यासाठी संबंधित आस्थापनाने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात येईल. अशा वाहनावर ‘जीवनावश्यक वस्तूसाठीचे वाहन ‘ अशा आशयाचे मोठे स्टीकर वाहनाच्या दर्शनी बाजूवर लावण्यात यावेत. असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी. म. मुगळीकर यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत विविध राज्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तरी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात दि. २३ मार्च २०२० पासून पूर्ण लॉकडाऊन घोषित केलेले असले तरी जीवनावश्यक वस्तुंना यातून सूट देण्यात आली असल्याने अशी वाहतूक सुरू असून ही वाहतूक करणा-या कर्मचा-याला संबंधित आस्थापनेने ओळखपत्र द्यावे. तसेच पोलिसांनी विचारणा केली असता हे ओळखपत्र दाखविण्यात यावे. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!