Share

परवानगी न घेता प्रवास करणाऱ्या महिलेसह नातेवाईक, रुग्णवाहिका मालक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: 

वर्धा : नागपूरहून खासगी रुग्णवाहिकेतून वर्ध्याला आलेल्या महिलेसह तिचे नातेवाईक, रुग्णवाहिका मालक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी न घेता नागपूरमधून वर्ध्याला आल्याने त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याच्या अन्वये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून नातेवाईकांना विलगीकरण कक्षात ठेवणार आहे. दरम्यान जिल्ह्यात चोरट्या मार्गाने प्रवेश केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी भीमनवार यांनी दिला आहे.

दरम्यान,राज्यात कोरोना राज्यात चांगलाच हातपाय पसरू लागला आहे मात्र लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. एकाबाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला काल 18 विद्यार्थ्यांनी टँकरमध्ये बसून जालना ते नांदेड असा जीवघेणा प्रवास केला. नांदेडमध्ये पोलिसांना संशय आल्याने त्यांनी 18 विद्यार्थ्यांसह चालकालाही ताब्यात घेतलं. यामध्ये 16 मुले आणि 2 मुलींचा समावेश आहे. सगळे विद्यार्थी तेलंगणा राज्यातील रहिवासी असून जालन्यात कृषीचे शिक्षण घेतात.

दरम्यान, नांदेडपर्यंत टँकरने आल्यावर पुढे पायी जाण्याचा त्यांचा विचार होता. हे विद्यार्थी पूर्णा रोडवर पोहोचताच भाग्यनगर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. सर्व विद्यार्थ्यांची रवानगी शासकीय रुग्णालयात करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!