Share

पराभवानंतर चाहत्यांचा कर्णधार कोहलीला सपोर्ट; म्हणाले, ‘आपण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकू’

Published On: 

अबुधाबी : आयपीएल आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. आयपीएलचा हा महासंग्राम आता रोमांचक वळणावर येऊन पोहचला आहे. ज्या संघाला आयपीएल विजयचा प्रबळ दावेदार मनला जात होता तो संघ आता स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

सोमवारी झालेल्या एलिमिनेटर मॅचमध्ये शारजाह मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात केकेराने आरसीबीवर मात करत विजय मिळवला आणि आरसीबी या पराभवासह आयपीएल मधून बाहेर पडली. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा इंडियन प्रीमिअर लीगमधील प्रवास सोमवारी संपला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे ९ वर्ष त्यानं नेतृत्व सांभाळले आणि २०१६मध्ये जेतेपदाच्या जवळ जाऊन त्यांना माघारी फिरावे लागले.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना आरसीबीचे फलंदाज सुनील नरेनच्या गोलंदाजीसमोर असहाय दिसला आणि 20 षटकांत 7 गडी बाद 138 धावा केल्या आणि केकेआरला विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य मिळाले.केकेआरने 19.4 षटकांत 6 विकेटवर 139 धावा करत विजयाचे लक्ष्य गाठले आणि सामना चार गडी राखून जिंकला. या विजयासह, केकेआरने पात्रता 2 मध्ये स्थान मिळवले, तर आरसीबीचा प्रवास या पराभवाने संपला.

RCBच्या या पराभवानंतर अनेकांनी कोहलीवर टीका केली, पण विराट कोहलीच्या समर्थकांनी त्याला धीर दिला आहे. आयपीएल ट्रॉफी नाही मिळाली तर काय झालं, आपण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकू, असा धीर विराटाच्या चाहत्यांनी यावेळी दिला आहे. १७ ऑक्टोबरपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि २४ ऑक्टोबरला भारताचा पहिलाच मुकाबला पाकिस्तानविरुद्ध आहे.

 

https://twitter.com/Rohith4698/status/1447625010378543104?s=20

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!