Share

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरचा झाला अपघात

Published On: 

मुंबई : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही आपल्या दमदार अभिनयामुळे नेहमी माध्यमांमध्ये चर्चेत असते. सध्या तिचा आगामी सिनेमा मिमीच्या शूटिंगसाठी राजस्थानमध्ये बिझी आहे. मात्र राजस्थानमध्ये सई ताम्हणकरचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सईचा हॉस्पिटलमधील एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. या फोटोत सईच्या पायाला दुखापत झालेली दिसतेय. सईच्या पायाला फ्रेक्चर झालेले दिसून येत आहे. सिनेमाचे शूटिंग करुन हॉटेलवर परतत असताना तिचा पाय मुरगळला आणि सूज आली. डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर पाय फ्रेक्चर झाल्याचे रिपोर्ट्स समोर आले.

मिमी हा सिनेमा मला आई व्हायचंय या मराठी सिनेमावर आधारित आहे. यात क्रिती सॅनन सरोगेट मदरची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.. लक्ष्मण उत्तेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!