Share

जेट एअरवेजमुळे एसबीआयच्या माजी अध्यक्षांवर जमीनीवर झोपण्याची वेळ

Published On: 

मुंबई : जेट एअरवेजचे विमान अचानक बाकू विमानतळावर उतरवल्यामुळे स्टेट बॅकेच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांना संपूर्ण रात्र जमीनीवर झोपून काढावी लागली. जेट एअरवेजच्या मुंबई ते लंडन प्रवासादरम्यान विमानात धूर निघाल्याने विमान अजरबैजानच्या बाकू विमानतळावर उतरविण्यात आले.

यामुळे भट्टाचार्यांसह अन्य प्रवाशांना १९ तास विमानतळावर ताटकळत रहावे लागले. १९ तासानंतर या प्रवाशांना दुसऱ्या विमानाने लंडनला पाठविण्यात आले. अरुंधती भट्टाचार्य या ‘बीए१९८’ या विमानाने मुंबईहून लंडनला जात होत्या. विमानात धूर आल्यानेे हे विमान तात्काळ बाकू विमानतळावर उतरविण्यात आले.

मात्र पुढचे १९ तास या प्रवाशांची राहण्याची आणि खाण्याची कोणतीच व्यवस्था विमान कंपनीकडून करण्यात आली नाही. दरम्यान, जेट एअरवेजने झाल्याप्रकाराबाबत माफी मागितली असून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे सर्वच प्रवाशांना त्रास झाल्याचे म्हटलेे आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!