टीम महाराष्ट्र देशा : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध आहे, परंतु १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल असेही न्यायालयाने म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर राज्य सरकारला १०२ च्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार आहे. आयोग नुसार मराठा समाज मागास आहे. अपवादात्मक स्थितीत ५० टक्के आरक्षणात बदल शक्य असल्याचेही न्यायालयाने म्हंटले. याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण सुरु राहील परंतु १६ टक्के नाही, असेही न्यायालयाने म्हंटले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी प्रयत्न केले होते. आज आरक्षण मिळताक्षणी त्यांनी समतेचे राजे छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले आहे. दिल्लीतल्या निवासस्थानी ते छत्रपती शाहू राजेंच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. आजच्या निर्णयाने मला खूप आनंद झालाय, अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ज्या ज्या मराठा तरूणांनी आरक्षण मिळावे म्हणून आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यांना मी आज खूप मिस करतोय, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप आभार मानतो. त्यांनी सरकारची बाजू चांगल्या पद्धतीने कोर्टात मांडली, असं संभाजीराजे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

