Share

महिलांना कमजोर समजू नका-पंकजा मुंडेंचा इशारा

Published On: 

बीड – राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे की, महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाहीत. जन्मापासून प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांना कधीही कमजोर समजू नका. राष्ट्रीय स्तरावर फक्त दोन टक्के महिला राजकारणात आहेत. एकीकडे जागतिक पातळीवरील राजकारणात कित्येक देशात महिलांना ५२ टक्के आरक्षण दिले गेले. परंतु, आपल्याकडे अजून या गोष्टीवर संपूर्णपणे विचार झालेला नाही, तो व्हायला हवा, असे मत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे चार दिवसीय ऑनलाइन दुसऱ्या राष्ट्रीय महिला संसदेच्या तिसऱ्या सत्रात ‘राजकीय नेतृत्व : महिला’या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या सत्रात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी खासदार मीनाक्षी नटराजन, डॉ. हर्षित पांडे, भाजप नेत्या वनाथी श्रीनिवासन, कर्नाटकच्या महिला परिषदेच्या अध्यक्षा प्रमिला नायडू, युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पंकजा मुंडे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा सांभाळल्यानंतर देशातील आर्थिक व संरक्षण विभागाच्या महत्त्वपूर्ण मंत्रिपदाचे सूत्र महिलांच्या हातात दिले आहे. तसेच ६ महिलांच्या खांद्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिली असून त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. या देशाचे लोकसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री, मंत्री अशा विविध पदांवरांची जवाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.

भविष्यात अनेक गोष्टींसाठी महिलांना सामना करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश करावा. अधिकारासाठी लढणाऱ्या महिला खूप आहेत, पण ज्यांच्या हातात शक्ती आहे. अशा महिला खरंच लढत आहेत का? हा एक प्रश्नच आहे. त्यामुळेच आजच्या काळात महिलांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा. त्यासाठी आरक्षणाचा आधार घ्यावा लागला तरी चालेल असेही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!