Share

‘निजामुद्दीनच्या धार्मिक मेळाव्यात सहभागी झालेल्या नागरिकांनो लपून बसू नका’

Published On: 

लातूर : कोविड -19 च्या अनुषंगाने कोरोना या विषाणूचा प्रसार व संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी निजामोद्दीन मशीद दिल्ली, जिल्हा पानिपत हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर भागात झालेल्या जमात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी आपली माहिती स्वतःहून खाली दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधून कळवावी, असे जाहीर आवाहन जिल्हाकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

प्रशासनातर्फे आपणास योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल. कोरोना विषाणूस प्रतिबंध हाच कोविड-19 यावर उपाय असल्याने आपण, आपले कुटुंब, आपले प्रियजन, आपला समाज, आपला गाव हे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी पुढाकार घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. तसेच आपण जमात या कार्यक्रमास सामील झाल्याची माहिती प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवल्यास व त्यातून पुढे भविष्यात आपण कोरोना बाधित आढळून आल्यास जाणीवपूर्वक कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग केल्याबद्दल आपणाविरुध्द भारतीय दंड विधान-1860 च्या कलम 269, 270, 188 व 34 अन्वये कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याव्दारे सुचित करण्यात येते की, त्यांच्याकडे वरील विषयी कांही माहिती असेल वर दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधून प्रशासनास माहिती देवून सहकार्य करावे.

संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. हिंमत जाधव अतिरिक्त पोलीस अधिक्षक, लातूर (भ्रमणध्वनी क्रमांक :- 7020669191), वीवि व्ही.के. ढगे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन लातूर( भ्रमणध्वनी क्रमांक 91 46 81 59 15), नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय लातूर दूरध्वनी क्रमांक-02382 -220 204.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!