Share

विजयी उमेदवारांची दिवाळी, पण शेतकऱ्यांचा शिमगा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिन्याभरापासून राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वांनी प्रचारसभांचा धडाका लावला होता. सोमवारी मतदानही पार पडले आणि आता निकाल हाती येण्यास काही तासांचा वेळ शिल्लक राहिला आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाकडे कोणत्याच उमेदवाराचे लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, कर्जमाफीबद्दल बोलणारे राजकीय नेत्यांनी मतदानानंतर शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. तर या धामधूमीत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सर्वाधिक मतदान देखील ग्रामीण भागात झालेले पाहायला मिळाले. मात्र ज्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मतदान केले आज त्यांच्याकडेच पुन्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

मतदानानंतर आता एक्झिट पोल, ईव्हीएम, युती,आघाडी तसेच सरकार कुणाचे येणार याची चर्चा चौकापासून प्रसार माध्य्मामाध्येही मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. मतदाना नंतर राजकीय पक्ष आणि नेते निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत तर प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीमध्ये गुंतली आहे. त्यामुळे राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकासानाकडे नेत्यांसह प्रशासनानेही पाठ दुर्लक्ष केले आहे.

मराठवाडा-कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. परतीच्या पावसाने खरिपिच्या काढणीस आलेल्या पिकांचे भिजून मोठे नुकसान झाले. काढून ठेवलेली सोयाबीन, भात, कापूस,ज्वारी पिके पाण्यात गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
मतदानाच्या निकालाकडे लक्ष लागल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कुणीच पुढाकर घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1186953721172779008?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1186955312596541440?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!