Share

समाज मंदिरासाठी तोडले शौचालय, मुख्याधिकार्‍यांना टमरेल देत नागरिकांनी नोंदवला निषेध 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अंबरनाथमधील  स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक अनोखे आंदोलन केले आहे. चिंचपाडा परिसरातील नागरिकांसाठी एमएमआरडीएने सुसज्ज  बांधलेले शौचालय अंबरनाथ नगरपरिषदेने पाडल्याने स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकार्‍यांना टमरेल भेट देत आंदोलन केले आहे.

एमएमआरडीएच्या निधीतून अंबरनाथ पश्चिमेला चिंचपाडा भागात सुसज्ज व चांगल्या स्थितीत शौचालय बांधले होते. मात्र नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी हे शौचालय तोडले. यामुळे संतप्त स्थानिकांनी आंदोलन केले. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी या नागरिकांचा विचार न करता हे शौचालय तोडले. त्यामुळे अंबरनाथ स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना टमरेल भेट देत आंदोलन केले.

दरम्यान सात वर्षापूर्वी एमएमआरडीएने तब्बल ३५  लाख रुपये खर्च करून या ठिकाणी शौचालयांची उभारणी केली होती. मात्र, अंबरनाथ नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने परिसरातील नागरिकांना कुठलीही सूचना न देता, हे शौचालय तोडले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना नैसर्गिक विधीसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर शौचालयाच्या जागेवर समाज मंदिर बांधण्याचा घाट नगरपालिकेने घातला आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!