मुंबई : रवी जाधव हे नाव घेताच सिनेसृष्टीतील नटरंग, बालगंधर्व, टाईमपास अशी हिट आणि दर्जेदार चित्रपटांची आठवण सहज होऊन जाते. प्रवाहाबाहेर विचार करून आपला चित्रपट साकारणाऱ्या रवी जाधव आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव यांचा जन्म २२ सप्टेंबर १९६६ रोजी मुंबईतील एका सर्वसामान्य कुटूंबात झाला. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून ग्राफिक डिझाईनमध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर एका मोठया जाहिरात एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि कॉपी रायटर म्हणून काम केले. त्यानंतर २००९ साली सुपरहिट अशा नटरंग’ सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. यानंतर त्यांनी २०११ साली नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्यावर आधारित एका बायोपिक सिनेमा आला ‘बालगंधर्व.’ नटरंग प्रमाणे या सिनेमाचे देखील यशाचे आणि लोकप्रियता गाठली. या चित्रपटास अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ‘बालक- पालक’ या चित्रपटानंतर रेगे, कॉफी आणि बरेच काही, रंपाट, टाईमपास, टाईमपास२, न्यूड आदीं चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी २०१६ साली बँजो या सिनेमातून बॉलीवूडमध्ये देखील पदार्पण केले.
https://www.instagram.com/p/CUHM2cvAOrj/?utm_medium=copy_link
एका उत्कृष्ट दिग्दर्शक असण्यासोबतच ते निर्माते, पटकथा लेखक आणि अभिनेते देखील आहेत. २०१७ साली प्रसाद ओकच्या कच्चा लिंबू सिनेमात मुख्य भूमिका साकारून त्यांनी सर्वांना आश्चार्याचा धक्का ही दिला होता. मित्राची बहिण मेघनासोबत लग्न केले. त्यांचा मेघना या रवी जाधव यांच्या प्रोडक्शन कंपनीमध्ये फिल्म प्रोडक्शन, मीडियाची जबाबदारी सांभतात. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मराठी सिनेसृष्टीतील योगदान आणि प्रवाहा बाहेरील विषयांची मांडणीमुळे इंडस्ट्रीमध्ये वेगळंपण पहायला मिळतं.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंद्रा पोर्टवरील ३००० किलो ड्रग्ज प्रकरणात अदानी समूहाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…
- आरोग्य विभागाच्या भरतीचे प्रवेश पत्र पुढील दोन दिवसात विद्यार्थ्यांना मिळणार; युवासेनेच्या पाठपुराव्याला आले यश
- ‘राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न कशासाठी? ‘भाजप’ महिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘या प्रस्थापितांच्या सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे पुन्हा सिद्ध झाले’
- सलमान खान सोबत काम करतांना जॅकी उर्फ जग्गुदादाला असा आला अनुभव..


