मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरून जोरदार टीका केली आहे. “मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत, तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल,” असा घणाघात शरद पवार यांनी केला आहे.
“कोकणवासीयांच्या अपेक्षा पूर्ण होतील हे लक्षात घेऊ. मुख्यमंत्री सतत माहिती घेत आहेत. पालकमंत्री काम करत आहेत. यातून काहीतरी होईल. एका दिवसात प्रश्न सुटणार नाही. लोकांनी धीर सोडला नाही, ते कामाला लागले आहेत. राज्यातील यंत्रणा संकटग्रस्तांच्या मागे उभी आहे. उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईल, त्यानंतर गरज असेल तर केंद्राशी पण चर्चा करु. मुख्यमंत्री हे प्रश्न घेऊन केंद्राकडे जातील. पर्यटन क्षेत्रासाठी वेगळी अधिकची मदत करण्याची गरज आहे. त्याबाबतही सरकारला सांगू,” असं पवार यावेळी म्हणाले.
कोकण दौऱ्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात तरी भर पडेल – शरद पवार
यानंतर आत देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. कोकण दौऱ्यापूर्वी त्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांचं जे म्हणणं आहे मी ऐकलं. मी विदर्भातला आहे, मी समुद्राची पाहणी करायला चाललो आहे. मात्र मी अनेकदा बारामतीत गेलो आहे. मात्र तिथे मला काही समुद्र दिसला नाही,” असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. “जर आपल्याला बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायचं असेल तर तेंडूलकर आणि गावस्करला प्रशिक्षण द्यावं अशी अट नाही,” असा टोलाही फडणवीसांनी पवारांना लगावला.
तर, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहे. जर माझे वडील असते तर ते त्याच वयाचे असते. शेवटी प्रत्येक बापाला हेच वाटतं की, आपल्या पोराला आपल्यापेक्षा कमी समजतं. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तिचं भावना असते,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले. “कदाचित पवारांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सिनियरवर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे आणि काही तरी करा असे सांगायचं असेल,” असेही ते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
विधानपरिषद निवडणूक: राजू शेट्टी आमदार व्हा, शरद पवारांची खुली ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

