सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यानंतर आता सोलापुरातही कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. पुढील 3 दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. याकाळात जीवनावश्यक सेवा, मेडिकल आणि दूध वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहे. किराणा, भाजी, फळं काहीही सुरु राहणार नाही, असे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आहे.
सोलापुरातही अचानक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढली आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर शहरामध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करुन शहराच्या सर्व हद्दी बंद करणं आवश्यक आहे. त्यामुळे 20 एप्रिल 2020 दुपारी 2 पासून 23 एप्रिल 2020 रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करुन शहरातील सर्व दुकानं आणि शहराच्या सर्व हद्दी बंद करण्यात येत आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकात म्हटलं आहे.
या आदेशात वैद्यकीय सेवांना सुट देण्यात आली आहे. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवणारी खाजगी/ सरकारी रुग्णालये, दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी आणि त्यांची वाहने, तसेच SARI, ILI आणि Contact Tracing या आजारासंदर्भात सर्व्हेक्षण करणारे अधिकारी, कर्मचारी, ॲम्बुलन्स सेवा. रुग्णालयामध्ये आणि दवाखान्याशी संलग्न असणारी औषधांची दुकाने तसेच इतर औषधांची दुकाने त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.
दरम्यान जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी आणखीन एका कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या चौदावर पोहचली आहे. सदर व्यक्ती हा पाच्छापेठ परिसरात आहे. तर इतर १२ जण पाच्छा पेठ परिसरसतील आहेत. त्यांच्यावर सिव्हिलहॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
मारुती कंपनीच्या कार महागल्या, खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

