🕒 1 min read
नवी दिल्ली – देशात कोरोना लसीकरण अभियान चालु आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे मात्र लहान मुलांच्या लसीकरणाच्या संदर्भात देखील प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहेत. यातच आज केंद्र सरकारने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिल्याचे वृत्त आले होते. मात्र आतापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) लसीच्या वापरासाठी मान्यता दिली नसल्याचे सांगितले आहे.
“केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांनी काहीतरी गैरसमज झाला असून तज्ज्ञांच्या समितीशी लहान मुलांनाही लस देण्यासाठी कोवॅक्सिनला परवानगी द्यावी याबाबतची बोलणी सुरू असल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) त्याला मान्यता दिलेली नाही.” अशी मीहिती पवार यांनी दिली आहे. दरम्यान, भारतात विकसित झालेल्या करोना लस कोव्हॅक्सिनचे निर्माता भारत बायोटेकने शनिवारी २-१८ वयोगटातील मुलांसाठी चाचणी डेटा DCGI ला पाठवला आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.कृष्णा एला यांनी ही माहिती दिली.
लहान मुलांवर केलेल्या करोना लसीच्या चाचणीचे निकाल समाधानकारक आहेत. यामध्ये तीन चाचण्या झाल्या आहेत. चाचणीचे निकाल DCGI ला सादर करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, लवकरच कोव्हॅक्सिनला मान्यता मिळू शकते. तसेच लसीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे सरकारकडून मुलांना जारी केली जाऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची करडी नजर?; पुराव्यासह केला आरोप
- ‘जर धोनी भाई खेळत नसेल तर…’, सुरेश रैनाचा आयपीएल निवृत्ती योजनेबद्दल मोठा खुलासा
- आरसीबी फक्त 10 खेळाडूंसह खेळत होता; परभावानंतर सेहवाची संघावर टीका
- औरंगाबादेत बसच्या एक्सलेटरचे नट निखळले; मोठा अपघात टळला!
- ‘हा प्रश्न मला विचारू नका’ म्हणत चालू मुलाखतीतून माईक फेकून मलिक निघून गेले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
