मुंबई : पुणे आणि मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे.
ठाण्यात पहिलाच रुग्ण सापडला आहे. तो ३५ वर्षांचा आहे. फ्रान्सहून तो परत आला आहे. तर पुण्यातही एका ३३ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. हिंदुजा रुग्णालयात दाखल असलेला आणि दुबईहून परत आलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीलाही करोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणी अहवालातून स्पष्ट झालं.
तसेच याआधी अमेरिकेहून आलेल्या पुण्याच्या 33 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. अशाप्रकारे आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 वर पोहचली आहे. सर्व कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांचाही शोध युध्दपातळीवर सुरु आहे. आज राज्यात एकूण 50 नवीन संशयित भरती झाले आहेत, असी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, १२ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १२९५ विमानांमधील १ लाख ४८ हजार ७०६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार, सर्व देशांहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या ३ विमानतळांवर करण्यात येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

