Share

आयपीएस अधिकाऱ्यांवर कोरोनाचे संकट, बढत्या-बदल्या पडल्या लांबणीवर

Published On: 

मुंबई : कोरोनाचा फटका आता प्रशासकीय कामावर देखील पडला आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आता लांबणीवर पडणार आहेत.  कोरोनामुळे प्रशासकीय यंत्रणेवर खूप ताण आल्याने नियोजित कामं आता लांबणीवर पडली आहेत. कोरोनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे .त्यामुळे त्याच्या नियंत्रणावर प्राधान्य दिले जाणार असून परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल ,असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबतचे वृत्त दै. लोकमतने प्रसिद्ध केले आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांचे प्रमोशन व बदलीकडे पोलीस वर्तुळासह विशिष्ट घटक आणि सामान्यांचेही लक्ष लागून राहिलेले असते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आयपीएसच्या  बदल्याचे हे  पहिलेच गॅझेट असणार आहे . साधारण मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या मध्यापर्यत  बदल्या करण्याचे पहिल्यांदा  गृह विभागाचे नियोजन होते. मात्र कोरोनाच्या भीषण संकटामुळे या सर्वावर पाणी फिरले आहे.

दरम्यान कोरोनाची दाहकता वाढत राहिल्याने हा विषय बाजूला पडला आहे. त्यामुळे  ज्या अधिकाऱ्यांचा एका पदावर दोन वर्षाचा कालावधी पुर्ण होवून  बदलीसाठी  पात्र  ठरलेत, त्यांना काहीकाळ त्याच पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!