Share

जगाची डोकेदुखी वाढविणाऱ्या चीनमध्ये पुन्हा आणखी ३० जण कोरोना बाधित आढळले

Published On: 

नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या 65 हजारावर गेली आहे. आतापर्यंत जगभरात 12 लाखापेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून आतापर्यंत 190 देशांमध्ये पसरला आहे, आतापर्यंत कोरोनाचे 2 लाखाहून अधिक रूग्ण बरे झाले आहे. सध्या जगात नऊ लाख जण कोरोनाबाधित असून त्यातील पाच टक्के म्हणजे 42, 288 रूग्ण गंभीर आहे.

दरम्यान, चीनमध्ये पुन्हा आणखी ३० जण कोरोना बाधित आढळले असून यापैकी तीन जणांना समूह संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे, तर १३ जण वूहान प्रांतातील कमी धोका क्षेत्रात आढळून आले आहेत. तसंच ४७ नवीन असिम्टोमॅटीक रुग्ण आढळले असून आतापर्यंत १हजार २४ असिम्टोमॅटीक रुग्ण उपचार घेत आहेत. असिम्टोमॅटीक म्हणजेच कोरोनाची लागण झालेला असा रुग्ण ज्याच्यात कोरोनाची लागण झाल्याची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत.

दरम्यान,भारतात देखील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. लडाखमधील कोरोना बाधितांपैकी सात जणांची कोरोना चाचणी नकारात्मक आल्यानं त्यांना रूग्णालयातनं घरी सोडण्यात आलं आहे. यामुळे लडाखमधील १४ बाधितांपैकी बरे झालेल्यांचा आकडा आता दहावर पोहोचला आहे. मार्चच्या सुरुवातीलाच लडाखमध्ये कोरोनाची लागण पसरल्याचं समोर आलं होतं. मात्र प्रशासकीय यंत्रणेला नागरिकांनीही सकारात्मक पाठींबा दिल्यानं कोरोनाची साथ आटोक्यात ठेवण्यात लडाखनं चांगलं उदाहरण घालून दिलं आहे.

इंदूर, भोपाळ आणि बारवानी जिल्ह्यात नवीन कोरोना बाधित आढळल्यानं आता मध्यप्रदेशमधल्या एकुण कोरोना बाधितांची संख्या १७९ झाली आहे. तर राज्यात आत्तापर्यन्त ११ जण कोरोनामूळं दगावले असून ३६ जण पूर्ण बरे झाले आहेत. भोपाळ आरोग्य विभागाचे संचालक जे. विजय कुमार यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यानं त्यांच्या संपर्कात आलेल्या बऱ्याचशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

पुणे शहराच्या करोनाची बाधा झालेल्या दोन रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. यामध्ये एका ६० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा तर ५२ वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. पुरुषाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यांना करोनाची बाधा झाल्याचे अहवाल रात्री उशिरा आले होते. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!