Share

#corona : कोरोनामुक्त झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने केला शिरकाव

Published On: 

सिंधुदुर्ग : कोरोनामुक्त झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. लॉकडाऊन असताना मुंबईहून सिंधुदुर्गला आलेल्या कुटुंबातील लहान मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

कुडाळ येथील 15 वर्षीय मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 20 तारखेला लॉकडाऊन असताना ही मुलगी कुटुंबासह मुंबईतील हॉटस्पॉटमधून आली होती. मुलीच्या पालकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खबरदारी घेण्यास सांगितले जात आहे.

याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर म्हणाले  की, पुन्हा नवीन रुग्ण मिळाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. या रुग्णावर उपचार   सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्हा   कोरोनामुक्त झाला  होता. मात्र आता पुन्हा     एकदा    रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज  झाली आहे.

दरम्यान कोरोनाच्या संकटात स्वतः रस्त्यावर उतरून भाजप आ. नितेश राणे यांनी जनतेची जनजागृती केली आहे. घरी राहा सुरक्षित राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. हातात माईक घेऊन फोंडाघाट बाजारपेठेतुन नितेश राणे यांनी जनजागृती केली.

कोरोनामुळे सर्वच राज्य बेजार झाले आहे. मुंबई – पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवरचं सिंधुदुर्गच्या जनतेला जागृत करण्यासाठी नितेश राणे हे रस्त्यावर उतरले व त्यांनी जनतेला काही सूचना केल्या. घरी राहून कोरोनाशी लढा आणि प्रशासनाला मदत करा, असे आवाहन त्यांनी केले.

बाळासाहेबांच्या जिवलग ‘सामना’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!