Share

CM ठाकरेंनी केली बीकेसीत होणाऱ्या एक हजार बेडच्या कोविड रुग्णालयाची पाहणी

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या कोरोनाने विशेष रुग्णालयाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः भेट दिली. यावेळी रुग्णालयाच्या उभारणीबाबतचा सविस्तर आढावा घेतला.

वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) युद्धपातळीवर कोरोनासाठी स्पेशल 1 हजार बेडचं रुग्णालय उभं करण्यात येत आहे. हे रुग्णालय भविष्यात कोरोना सारख्या आजारांवर मात करण्यासाठी आपली महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या महत्वकांक्षी प्रकल्पाला भेट दिली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट देत जोमाने व युद्धपातळीवर सुरू असलेल्या या रुग्णालयाच्या कामाची पहाणी केली. तसेच, सर्व तज्ज्ञ मंडळींसोबत चर्चा केली. ठाणे येथील ज्युपिटर हाॅस्पिटल व एमएमआरडीए यांच्या संयुक्त निदर्शनाखाली या रुग्णालयाची निर्मिती करण्यात येत आहे. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, एमएमआरडीए आयुक्त आर. राजीव आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान राज्यात कोरोनाने नाही नाही म्हणता अनेकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. राज्यात मंगळवारी कोरोनाच्या 841 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,525 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!