🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून ही येतं. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. जेनेलिया ही नेहमीच इन्स्टाग्रामवरुन विविध व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या मुलासोबत एक व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर आता जेनेलियाने पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर भरपूर कमेंट्स केल्या आहेत.
जेनेलियाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक रिलचा व्हिडीओ तयार केला आहे. ‘तू एवढी सुंदर दिसतेस, तर तुला परी म्हणू की सुंदरा…,’ असा प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहे. त्यावर ती ‘अरे ताई म्हण…ताई!’ असे उत्तर देत जेनेलिया हसायला लागली. या व्हिडीओत जेनेलियाही फार क्यूट दिसत आहेत. यात तिचा नेहमी दिसणारा निरागस स्वभाव पाहायला मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यावर फार मजेशीर कमेंट केल्या आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी जेनेलियाने तिचा मोठा मुलगा रियानसोबतचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला होता. यात जेनेलिया व्हिडीओच्या’ तू कोण आहेस रे?’ असा प्रश्न विचारताना दिसते.
https://www.instagram.com/reel/CV16Hg9Iw5u/?utm_source=ig_web_copy_link
सध्या जेनेलिया सिनसृष्टीत कार्यरत नसली तरी तिच्या व्हिडिओच्या माध्यमाने चाहत्यांच्या संपर्कात असते. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. त्यानंतर तिने बरेच चित्रपटांत काम केले आहे. २०१२ मध्ये ते लग्न बंधनाता अडकले. त्या दोघांना रियान आणि रेहाल अशी दोन मुले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
