मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यावरुन सध्या चांगलंच राजकारण रंगताना दिसत आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्वीट केलं असून यात त्यांनी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका असे म्हटले आहे. वाघ यांनी यात कोणाचेही नाव घेतलेले नाहीये. मात्र, त्याचा रोख कुणाकडे आहे हे लक्षात येतेय. त्यामुळे यावरून नवा वाद सुरू झाला आहे.
चित्रा वाघ यांच्या या ट्विटवर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी चाकणकर यांना या टि्वटबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, चित्रा वाघ यांच्या टि्वटबद्दल मला काही बोलायचं नाही. तसंच महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची कुठलीच कल्पना नाही असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले. ज्या गोष्टीची माहितीच नाही त्याबद्दल वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं चाकणकर म्हणाल्या. संघटनेची महिला अध्यक्ष म्हणून उत्तम रित्या काम चालू आहे. मनाला समधान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
चित्रा वाघ काय म्हणाल्या?
महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असं टि्वट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खड्ड्यांमुळे जखमी झालेल्या व्यक्तीची थेट गडकरींकडे तक्रार; कंपनीविरोधात कारवाई
- ‘महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’पणा करणाऱ्यांवर बाबर सेना काय करणार?’, सदाभाऊंचा सवाल
- ‘जरंडेश्वर शुगरचा खरा मालक लपवण्यासाठी पवारांनी डझन कंपन्यांचे लेयर तयार केले’, किरीट सोमय्यांचा दावा
- ‘आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ’,शिवसेनेचा मोदींना टोला
- सरकारी कागदावर महागाईचा दर घटला असेल,पण वास्तवातील आकड्याचे काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
