Share

धनगर समाजाचे दोन सुपुत्र राज्यात मंत्री , लवकरच समाजाला न्याय मिळेल – उन्मेष पाटील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : धनगर समाजाचे दोन सुपुत्र राज्यात मंत्री आहेत धनगर समाजाच्या भल्यासाठी शासन दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार धनगर समाजाच्या सवलतीच्या संदर्भात शासन सकारात्मक असून लवकरच धनगर समाजाला न्याय हक्क मिळेल. केंद्राची भूमिका लवकरच स्पष्ट होणार आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाज बांधव आर्थिक उन्नतीचे दारे उघडी झाली आहेत. स्किल डेव्हलपमेंट युक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू असून घरोघरी गॅस योजनासारखे लाभ दिले. आपण ज्या पद्धतीने मला घवघवीत मतांनी निवडून दिले यामुळे माझी जबाबदारी वाढली असून आपणास विश्वास देतो की केंद्राच्या माध्यमातून मतदार संघाचे विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही.असा विश्वास नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला आहे.

समस्त बदरखे ग्रामस्थ ,आखतवाडे, मोहळाई,कुसुंबा ग्रामस्थ ,नमो महाराष्ट्र शाखा,धनगर समाज उन्नती मंडळ तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोहळा समितीच्या वतीने जळगाव लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांचा नागरी सत्काराचे आयोजन आज सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

धनगर समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबातली कन्या मीनाक्षी कंखरे हिने जिद्दीने अभ्यास करून यश मिळवित पोलिस निरीक्षक पदावर विराजमान झाली. मीनाक्षीताई हिने आपली गरिबीच्या परिस्थिती चा बाऊ न करता मेहनतीने सर्वांना अभिमान वाटेल असे यश संपादन केले. वडील ट्रकटर ड्रायव्हर असताना भावाच्या मदतीने समजासमोर आदर्श उभा केला आहे त्यामुळे समाजातील तरुण पिढीने शिक्षणाची कास धरावी अशी भावना खासदार उन्मेष पाटील यांनी प्रसंगी व्यक्त केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!