नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी 20 लाख करोडचं आर्थिक पॅॅकेज जाहीर करत देशात लॉकडाऊन वाढणार असल्याचे घोषित केले. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मोठी घोषणा केली आहे.
सर्व केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. हा निर्णय 1 जूनपासून अंमलात आणला जाणार आहे. यामुळे 10 लाख केंद्रीय अर्धसैनिक दलातील सुमारे 50 लाख कुटुंबे केवळ 2800 कोटी रुपयांची देशी उत्पादने खरेदी करतील, अशी घोषणा अमित शहा यांनी केली आहे.
कल माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने देश को आत्मनिर्भर बनाने और लोकल प्रोडक्ट्स (भारत में बने उत्पाद) उपयोग करने की एक अपील की जो निश्चित रूप से आने वाले समय में भारत को विश्व का नेतृत्व करने का मार्ग प्रशस्त करेगी। pic.twitter.com/KlYD9Z7UVt
— Amit Shah (@AmitShah) May 13, 2020
अमित शाह यांनी ट्वीट करत, काल पंतप्रधानांनी देशाला आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. लोकांना जास्तीत जास्त स्वदेशी वस्तुंचा वापर करण्यास सांगितले होते. यामुळं निश्चितच येणाऱ्या काळात भारत जगाचे नेतृत्व करू शकेल, असेही शहा यांनी सांगितले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेशी संवाद साधत चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनबाबत माहिती दिली. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशा उत्पादनांवर जास्त भर देण्याचे आवाहन लोकांना केले होते. यासाठी मोदींनी Vocal for Local हे सांगत लोकानां स्वदेशी वस्तुंचा जास्तीत जास्त वापर करण्यास सांगितले.


