Share

दणका ! तुकाराम मुंडेंचा ; नागपूर मनपाच्या महापौरांचे धुडकावले आदेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : नागपूर महानगर पालिकेचे महापौर संदीप जोशी यांनी ज्या विकासकामांचे कार्यादेश झाले आहे, ती कामे सुरू करण्यास तत्काळ परवानगी द्यावी तसेच लेखा व वित्त अधिकारी यांची प्रतिनियुक्ती बेकायदेशीर असल्याने त्यांना परत पाठवण्यात यावे, असे आदेश आयुक्त तुकाराम मुंडे यांनादिले होते. यावर आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले होते.

पण महापौरांनी महापालिकेच्या सभागृहात प्रशासनाला दिलेले आदेश आयुक्तांनी धुडकावून सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे. यावर सत्ताधारी आणि आयुक्त यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे दिसून येते.

आयुक्त तुकाराम मुंढे नियमांवर बोट ठेवून काम करतात याचा आनंद आहे. पण त्यांनी नियम सर्व गोष्टींसंदर्भात लागू करायला हवेत. मात्र दुर्देवाने तसं होताना दिसत नाही. म्हणून यापुढे आम्ही आयुक्त नियमांनीच उत्तर देऊ,” असा पवित्रा नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे. आपल्या बेधडक कारवाईमध्ये अगदी कर्मचाऱ्यांपासून बेकायदा बांधकाम करणाऱ्यांपर्यंत अनेकदांना मुंढेंबद्दल एक आदरयुक्त भिती आहे. मात्र अर्थसंकल्प वेळेत न दिल्यावरुन जोशी यांनी मुंढेंवर निशाणा साधला आहे.

सरकारनामा’ ने दिलेल्या वृत्तानुसार, दलित वस्त्यांच्या विकासाचा निधी रोखता येत नाही. मात्र, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 56 कोटींची कामे रोखली असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा अप्रत्यक्ष इशाराच सत्तापक्षातील नेत्यांनी दिला. नियमांनुसार आयुक्तांनी १५ फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी अर्थसंकल्प महापालिकेच्या स्थायी समितीकडे सुपूर्द करायचा असतो. मात्र तसं घडलं नाही. नियमांनुसार ही गंभीरस्वरुपाची चूक आहे. यासाठी आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीचे मार्गदर्शन मागितलं आहे. यासंदर्भात १२ मार्च रोजी विशेष सभागृह आयोजित करण्यात आलं आहे. आयुक्तींनी केलेली आर्थिक कोंडी ही नगरसेवकांची नसून जनतेची आहे. आम्हाला पालिकेचा कारभार पाहताना त्यांच्यांशी स्पर्धा करायची नाही किंवा त्यांची कोंडी करायची नाही., शहरातील कामे व्हावी आणि त्यासाठी निधी मिळावा इतकचं आमचं म्हणणं आहे,” असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, एखाद्या महानगरपालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या विकास कामांच्या कागदपत्रांवर आयुक्तांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. यापूर्वीच्या आयुक्तांनी अनेक कार्यादेश काढले होते. मात्र मुंढे नागपूरच्या आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. “मुंढे हे कडक शिस्तीचे आहेत. त्यांचा काम करण्याचा वेग आणि धडाका चांगला आहे. याबद्दल त्यांचे कौतुक आहेच. मात्र जनतेची काम करण्यासाठी सरकारने त्यांना आणि जनतेने मला इथं बसवलं आहे, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कोणत्याही कारणामुळे जनतेची कामे थांबू नयेत, इतकचं आमचं म्हणणं आहे,” अशा शब्दांमध्ये महापौरांनी आयुक्तींनी कामांना दिलेल्या स्थगितीसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!