Share

भाजपा नेत्या चंद्रकांता गोयल यांचे निधन

Published On: 

मुंबई : केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचे शनिवारी सकाळी निधन झाले आहे. पीयूष गोयल यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “आपल्या आपुलकीने आणि प्रेमाने मला मार्ग दाखवणारी माझी आई चंद्रकांता गोयल यांचे आज सकाळी निधन झाले. आपल्या संपूर्ण जीवनात त्यांनी लोकांची सेवा केली. मलाही त्यांनी लोकांची सेवा करावी, अशी प्रेरणा दिली. ईश्वर त्यांना त्यांच्या चरणाशी जागा देवो, ॐ शांती,” असे ट्विट त्यांनी केले आहे.

चंद्रकांता गोयल या भाजपा नेत्या होत्या, महाराष्ट्र विधान परिषदेवर बरीच वर्षे आमदार होत्या. मांटुगा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

पीयूष गोयल यांच्या ट्विटनंतर अनेक पक्षाच्या नेत्यांनी चंद्रकांता गोयल यांना श्रद्धांजली वाहिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पूनम महाजन यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विटरवरून चंद्रकांता गोयल यांना श्रद्धांजली वाहिली.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!