Share

एसटीच्या एसी स्लीपर शिवशाही बसच्या तिकीट दरात भरघोस कपात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एस.टी महामंडळ वातानुकुलित शिवशाही शयनयान (AC Sleeper) बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करीत आहे. कमी झालेले नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दर कपात करण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घोषित केले. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात आली आहे.

एस.टी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. सध्या, एस.टी. महामंडळातर्फे राज्यातील विविध ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. कमी झालेल्या तिकीट दरांमुळे खाजगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा करीत जास्तीत जास्त प्रवासी वाढवण्याचे उद्दिष्ट एस.टी महामंडळाने ठेवले असून प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात आणखी नवीन मार्गावर शयनयान बस सुरु करण्याची तयारी ठेवली आहे.

वातानुकूलित शिवशाही शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार असल्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित आरामदायी व किफायतशीर शयनयान प्रवासासाठी एसटीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान बसचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!