🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून जगभरात थैमान घातलेल्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने इतर सर्व देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणारा कोरोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत आहे. भारतात दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला होता . मात्र आता कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका आहेच. युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे.
त्यानंतर, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला होता. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी ३१ डिसेंबरपर्यंत लागू करण्यात आली होती.
त्यांनतर ब्रिटनहून भारतात येणाऱ्या उड्डाणांना 7 जानेवारी 2021 (गुरुवार) पर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी शिफारस आरोग्य मंत्रालयाने नागरी उड्डयन मंत्रालयाला केली होती. आरोग्य सेवा महासंचालक (डीजीएचएस) आणि डीजी, आयसीएमआर आणि सदस्य (आरोग्य), नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या संयुक्त देखरेख गटा (जेएमजी) कडून प्राप्त माहितीच्या आधारे ही शिफारस केली होती.
या पार्श्वभूमीवर आता खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने तातडीने घेतल आहे. यामध्ये विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊलं ठेवलं आहे. भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. आता आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
