Share

Bank- 1 कोटी भारतीयांच्या बँक खात्यांची माहिती लीक

Published On: 

देशातील किमान एक कोटीहून अधिक बँक खात्यांची माहिती लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीयांच्या बँक खात्यांची माहिती जमा करून विक्री करणारं रॅकेट दिल्ली पोलिसांनी उघड केलं आहे. हि माहिती फक्त 10 ते 20 पैशांत विकली जात असल्याचंही सांगितले जात आहे.

दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागात राहणाऱ्या एका 80 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या क्रेडिट कार्डवरून 1.46 लाख रुपये गायब केले गेले. क्रेडीट कार्डाद्वारे हे पैसे काढण्यात आले होते. या घटनेचा तपास करताना बँक खात्यांची माहिती लीक करणारे एक रॅकेट सापडले. या रॅकेटमध्ये बँकेत आणि कॉल सेंटर्समध्ये काम करणारे कर्मचारीही आहेत. हे आरोपी ग्राहकांच्या खात्याची माहिती घेतात आणि नंतर ही माहिती विकतात. हे रॅकेट चालवणा-या सूत्रधारालाही पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी पांडवनगरमध्ये पुरन गुप्ता या तरुणाला अटक केली होती. गुप्ताने यापूर्वीही 50 हजार लोकांची माहिती विकली होती. 10 ते 20 हजारांमध्येच त्याने या 50 हजार नागरिकांची माहिती विकल्याची माहिती उघड झाली आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये लोकांचे बँक खाते, क्रेडिट व डेबिट कार्डचा तपशील आणि पासवर्ड, जन्मतारीख आणि इतर महत्वाच्या माहितीचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!