Share

Bacchu Kadu | “मंत्रिमंडळाच्या पहिल्या रांगेत असण्याची अपेक्षा होती, पण…”; बच्चू कडूंनी बोलून दाखवली मनातली खदखद

Published On: 

Bacchu Kadu | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यासोबत शिवसेना पक्षातील काही आमदार आणि खासदार सोबत घेऊन राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. आता या सरकारला जवळजवळ शंभर दिवस होऊन गेले आहेत. त्याचबरोबर मंत्रीमंडळाचा विस्तारही झाला आहे. परंतू शिंदे गटातील काही नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशातच प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू (Bacchu Kadu)

बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाताना त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. तर काहीजण त्यांना कॅबिनेटमंत्रीपदाचा शब्द दिल्याचंही बोलत होते. याचसंदर्भात बच्चू कडू यांनी, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एक वक्तव्य केलं आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या रांगेत असण्याची अपेक्षा होती. मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीमध्ये स्थान असेल, असं वाटलं होतं. पण तसं झालं नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना कडू म्हणाले की, आमचे आमदार राजकुमार पटेल आधी गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर मीही गेलो. पण माझं असं म्हणणं होतं की, मी जाऊन एकनाथ शिंदेंसोबत काही मुद्द्यांवर बोलून परत येईल, असं वाटलं होतं. पण हे राजकारण आहे. त्यामुळे मलसा तिथून पर येता आलं नाही. कारण आम्हीही जेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी नगरसेवकांना घेऊन बाहेर जातो. तेव्हा त्यांनही आम्ही परत फिरू देत नाही. त्यामुळे तसंच माझ्यासोबतही झालं. हे राजकारण आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत असतात.

दरम्यान, बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि भाजप पक्षाचे नेते रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे समर्थक आहेत. तर बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या गटातील आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राणा आणि कडू यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या बैठकीकडे लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!