Share

Ashish Shelar । “जे घरकोंबडे आहेत, ते जनतेत राहतील कसे?”; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

(Ashish Shelar) मुंबई : दिवाळीनिमित्त मुंबईतील विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमावरून त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. वरळीतील जांबोरी मैदानात भाजपाचे कार्यक्रम होत आहेत, कारण मुंबईकरांशी आमची नाळ जोडलेली आहे. मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला कळतं. जे टीका करतायत त्यांना मुंबईकारांशी काही घेणंदेणं नसल्याचं म्हणत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

विशेषतः वरळीच्या आमदारांना पेग, पेग्विन आणि पार्टी याशिवाय काहीच दिसत नाही. वरळीच्या आमदारांनी मराठी साहित्य, संस्कृती, लोककला याबाबत केलेला एक कार्यक्रम दाखवावा. जे घरात झोपून राहतात, घरकोंबडे आहेत, ते जनतेत राहतील कसे? असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

वरळीत आदित्य ठाकरे आता आलेत. त्यांचा अभ्यास कच्चा असल्याचा टोला शेलारांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.  वरळीत विधानसभेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे आत्ता या मतदार संघात फिरत आहेत. यामुळे त्यांना मराठी माणसाच्या मनातील भाव कसे समजणार?, भाजप आणि मराठी जनता अशी एक वेगळी घट्ट नाळ जमली आहे. म्हणून आम्ही दिवाळी निमीत्त 233 ठिकाणी कार्यक्रम ठेवले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दादरच्या गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपत्तीवरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले, न्यायालयात असलेल्या प्रकरणावर मी भाष्य करणार नाही. मात्र, ज्यांनी ही याचिका दाखल केली आहे, ते मराठी आहेत. त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारल्याचे दिसून येत आहे असं शेलार म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!