Share

Arvind Savant | “हा चोरबाजार सुरू आहे…”; निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई :  ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून चिन्ह ‘मशाल’ दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’असं दिलं आहे.आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच ठाकरे गटातील बऱ्याच नेत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच शिवसेना पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी ठाकरे गटाला मिळालेल्या चिन्ह आणि नावाबाबत भाष्य केलं आहे.

काय म्हणाले अरविंद सावंत ?

‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आम्हाला मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण आमच्या पक्षाला नवीन चेहरा मिळाला आहे. आम्हाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. त्यामुळे आता आम्हाला मास्क लावावा लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या नावात ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्याचाही आम्हाला आनंद आहे. त्रिशूळ आणि उगवता सूर्य असे अन्य दोन पर्याय आम्ही दिले होते. या तीन पर्यायांमधील एक पर्याय निवडणूक आयोगानं स्वीकारला आहे. ‘मशाल’ हे आमचं केव्हातरी चिन्ह होतं.

सध्या हा चोरबाजार सुरू आहे, बापाला चोरा, पक्षाला चोरा, पक्षाचं चिन्ह चोरा असा प्रकार सुरू आहे. या चोरबाजाराला काही ग्रेट महाशक्तीचं सहकार्य मिळत आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही सादर केलेली माहिती ताबोडतोब लीक कशी होते? त्यानंतर शिंदे गटाकडूनही त्याच प्रकारची चिन्हं कशी काय देण्यात आली?, असे सवाल अरविंद सावंत यांनी याठिकाणी उपस्थित केले आहेत.

पुढे बोलताना सावंत असंही म्हणाले की, आम्हाला निवडणूक चिन्ह म्हणून क्रांती ज्योत मिळाली आहे. मशाल हे चिन्ह आमच्यासाठी नवखं नाही. जेव्हा आमच्याकडे कोणतीच निशाणी नव्हती, तेव्हा मशाल आणि ढाल तलवार ही आमची निशाणी असायची. 1989 नंतर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळालं. बाळासाहेब ठाकरे दररोज ‘धनुष्यबाण’ चिन्हाची पूजा करायचे. ते धनुष्यबाण चिन्हाशी एवढं भावनिक एकरूप झाले होते, म्हणून त्याचं सर्वाधिक दु:ख होतंय. शेवटी माणसं जास्त महत्त्वाची आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!