(Aravind Sawant) मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट पडले. ठाकरे गटाकडून नेहमीच शिंदे गटाला गद्दार म्हणून हिणवलं जात. तर एकनाथ शिंदेंचं भाषण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिलेली स्क्रिप्टच असल्याचा दावा देखील ठाकरे गटाकडून केला जातो. अशातच आता ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
नवी मुंबईत आज ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “बोलकं बाहुलं, बटणं दाबलं की सुरू होतं” असं म्हणत टोला लगावला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘अलीबाबा’ असून बाकीचे ४० चोर असल्याचं सांगत सावंत बंडखोर आमदारांना चिमटा काढलाय. दिल्लीत धारावीच्या पूर्नविकासाच्या प्रकल्पाचा करार राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत नाही, तर उपमुख्यमंत्र्यांसोबत होतो, असं सांगत त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले.
नारायण राणे यांच्यावर देखील अरविंद सावंत यांनी निशाणा साधलाय. पक्षातून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी राजकारणात ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ केला, असा टोलाही सावंत यांनी यावेळी लगावला. “कोकणातल्या कुटुंबात सर्वच सुक्ष्म आहेत. सुक्ष्म म्हटल्यावर अधिक बारकाई असा अर्थ होतो. पण सुचतच नाही अशा माणसाला. ही माणसं शिवसेनेला नेस्तनाबूत करणार का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीबीआयचे खटले दाखल आहेत. त्यामुळे पहिले मुख्यमंत्र्यांना तडीपार करा, अशीही मागणी सावंत यांनी केली आहे. अरविंद सावंत यांच्या या टीकेला भाजप आणि शिंदे गटाकडून काय उत्तर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nilesh Rane | “त्यांनीच मुलांना गेटबाहेर पाठवून…”; भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याबाबत निलेश राणेंचं मोठं वक्तव्यं
- Pankaja Munde | पंकजा मुंडेंचा अतिवृष्टी पाहणी दौरा ; शेतकऱ्यांना अश्रू अनावर
- Ramesh Kere । रमेश केरे प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळासाहेब सराटेंची प्रतिक्रिया!
- Aditya Thackeray | भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी व्हावी – आदित्य ठाकरे
- Riteish Deshmukh । रितेश देशमुख आणि जेनेलियाला 15 दिवसांत भूखंड कसा दिला? ; कारखाना आणि लातूर MIDC अडचणीत

