Share

राष्ट्रवादीला अजून एक धक्का ; छगन भुजबळ यांनाही कोरोना संसर्ग

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संबंधी नियम पाळण्यात कसूर करण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यामुळे रुग्ण संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झालीय. राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून राज्याचे अन्न पुरवठा आणि नागरी संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असून गेल्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये सोमवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत ही संचारबंदी लागू असेल. तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १ हजार रुपये दंड आणि प्रसंगी गुन्हा दाखल करायचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!