🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने पुढील दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा मागील आठवड्यात केली. यादरम्यान बीसीसीआयने शुक्रवारी १४ मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाचीही घोषणा केली आहे. एक कसोटी. ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद हे मिताली राज भुषवणार आहे. तर टी-२० संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरला देण्यात आले आहे. १६ जुनपासुन हा दौरा सुरु होणार आहे. १६ ते १९ जुन दरम्यान या मालिकेतील एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. तर २७, ३० जुन आणि ३ जुलैला एकदिवसीय सामने होणार आहे. तर टी-२० मालिका ही ९ ते १५ जुलै दरम्यान खेळवली जाईल.
The All-India Senior Women's Selection Committee on Friday announced the Indian squad for the one-off Test match, ODI & T20 series against England. #TeamIndia
Details ????https://t.co/FviNapoMIp pic.twitter.com/8DP8do1Z67
— BCCI Women (@BCCIWomen) May 14, 2021
प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या नियुक्तीनंतर ही भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिला दौरा आहे. यात रमेश पोवारची प्रशिक्षक म्हणून भारतीय महिला संघासोबत आधीची कामगीरी उल्लेखनिय नव्हती. तसेच डब्लु व्ही रमण यांना प्रशिक्षक पदावरुन हटवल्यानंतर आधीच वादाची स्थिती निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळणेही अवघड झाले आहे आणि हे अकाल्पनीक आहे’
- यशराज फिल्म्सचे मदतीसाठी एक पाऊल पुढे; आदित्य चोप्रा यांचा मोठा निर्णय
- सुपरहिट अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले ५६ व्या वयात पदार्पण
- अभिनेते परेश रावल यांनी त्यांच्या निधनाची अफवांवर दिले मजेशीर उत्तर…
- ‘अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात संघर्ष पूर्वापारपासून; आता तर विषय पैशांचा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

