Share

इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत जिल्हा न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Published On: 

संगमनेर: प्रसिद्ध लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती  महाराज देशमुख यांच्या वर  काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत आणखी वाढ होणार का? याकडे वारकरी सांप्रदायासह त्यांच्या चाहत्यावर्गाचे लक्ष लागले होते.

या प्रकरणी  निवृत्ती इंदुरीकर महाराज यांना कोर्टाने तुर्तास दिलासा दिला आहे. संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेल्या आदेशाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांना संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने हजर राहण्याचा आदेश दिले होते. या प्रकरणी आज सकाळी 11 वाजता सुनावणी झाली.

आजच्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नसणार आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाला 20 ऑगस्टला सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे. न्यूज 18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

‘अमुक दिवशी स्त्रिसंग केला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते’ असं वक्तव्य असलेला इंदुरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. मात्र, या व्हिडिओतील वक्तव्य कुठे आणि कधी केले याबाबत पुरावा नसल्याचे कारण देत मार्च मध्ये अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत मात्र पाठपुरावा करून संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर 26 जुन रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

… म्हणून होतेय एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी

मोठी बातमी: इंदुरीकर महाराजांची आज कोर्टात महत्वाची सुनावणी

राज्य सरकारची तत्परता;मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या १६ टीम तैनात

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!