सोलापूर : बुधवारी शिवसेना दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यावर सर्वांचं लक्ष लगालं होतं. परंतू यावर्षी शिवसेनेचे दोन मेळावे पार पडले एकनाथ शिंदेंचा आणि दुसरा उद्धव ठाकरे यांचा. या मेळाव्यामध्ये दोघांनी एकमेकांवर सडकून टीका, टिपण्णी केल्या. त्याचबरोबर शिंदे गट आणि ठाकरे या दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यामध्ये शक्तीप्रदर्शन केल्याचं आपण सर्वांनी पाहिलंच असेल. दोघांच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी होती. अशातच हा मेळावा कोण-कोणत्या नेत्यांनी पाहिला किंवा मेळाव्याला कोण-कोण उपस्थित होते. याविषयी अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच शिवाजी पार्क शेजारी राहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या घरच्यांनी कोणाचा मेळावा पाहिला असेल?, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी याबाबत एक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अमित ठाकरे ?
कोणाचा दसरा मेळावा पाहिला ?, असा सवाल केला असता, मी कोणताहीच दसरा मेळावा पहिला नाही, असं अमित ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नव्या उपक्रमाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अंतर्गत अध्यक्ष अमित ठाकरे मराठवाडा महासंपर्क अभियान राबवत आहेत. त्यामुळे आज ते सोलापुरात होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तसेच, मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या नव्या उपक्रमाबद्दल अमित ठाकरे यांनी माहिती दिली. हा दौरा मनसे विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, गणेशोत्सव नवरात्रीमुळे तो थांबलेला होता मात्र आता तो पुन्हा सुरू केला आहे. ज्यांना विद्यार्थी सेनेत काम करायचं आहे. अशा नवीन विद्यार्थ्यांना तरुण-तरुणींना मी भेटणार आहे. विद्यार्थी सेनेचा आढावा घेणार आहे. त्यानंतर मनसेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन राजसाहेबांपर्यंत पोहोचवणार आहे.
दरम्यान, मराठवाडा दौऱ्यापूर्वी अमित ठाकरे यांचे सोलापुरात कार्यकर्त्यांनी खूप जोरात स्वागत केलं. सोलापुरमधील सोन्या मारुती मंदिरात मारुतीची आरती करून अमित ठाकरे तुळजापूरला रवाना झाले असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil | शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती?, चंद्रकांत पाटलांचा खुलासा म्हणाले…
- Shivsena । विचारांचे सीमोल्लंघन आणि भोजनभाऊंची गर्दी!; शिवसेनेचा सामन्यातून हल्लाबोल
- Dasara Melava । उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य स्वित्झर्लंडमध्ये मजा करत होते; शिंदे गटाचा दावा
- Sudhir Mungantiwar | शिंदेंच्या दीड वर्षांच्या नातवाबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Shivsena । एसटी बसेस बुक करण्यासाठी 9 कोटी 99 लाख कोणी भरले?; दानवेंचा शिंदे गटाला सवाल


