Share

जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ‘आयटक’चे आंदोलन मागे!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गेल्या १४८ दिवसांपासून नोकरीत कायम करा, पगार दरमहा रु. २५ हजार रुपये करा, पगार दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत करा या मागण्यांसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले आंदोलन, साखळी उपोषण जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येेळीकर यांच्या आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले.

मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी कोविड योद्ध्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असेही आयटकने स्पष्ट केेले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ७४ कंत्राटी कामगारांचे गेल्या १४८ दिवसांपासुन साखळी उपोषण सुरु होते. या उपोषणाबाबत अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, सहाय्यक कामगार उपायुक्त कार्यालय, वैद्यकीय शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना अनेकदा निवेदने दिलेली आहेत.

कामगारांना पीपीई किट, एन-९५ मास्क, सॅनीटायझर इ.  सुरक्षा नसतांना मार्च २०२० पासुन कोविड रुग्णांची सेवा केली. व त्यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली होती. व अजुनही काम बंद न करता ६ ते ७ हजार रुपयांच्या तुटपुंज्या पगारात ७४ कंत्राटी कामगार रुग्णसेवा करीत आहेत. रुग्णसेवा करून सेवा बजावल्यानंतर गेल्या १४८ दिवसांपासुन साखळी उपोषण करीत होते.

मात्र घाटी हॉस्पीटलमध्ये पाहणी करण्यासाठी वेळोवेळी येत असुनही प्रशासन, प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी उपोषणार्थींच्या सोबत एकदाही संवाद साधला नाही, विचारपूस केलेली नसल्याची खंत संघटनेच्या वतीने व्यक्त केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मी जिल्हाधिकारी म्हणून या मागण्यांसाठी लक्ष घालतो, माझ्यावर विश्‍वास ठेवा उपोषण मागे घ्या, असे आश्‍वासन दिल्यामुळे व घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनीही शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिल्याने आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेने कामगारांशी चर्चा करून उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!