Share

मांडव्याजवळील प्रवासी बोटीच्या अपघातात प्रसंगावधान राखत कार्यवाही; जीवितहानी नाही

Published On: 

मुंबई : मांडव्याजवळ आज सकाळी एक प्रवासी बोट समुद्रातील खडकास आदळल्याने पृष्ठभागास छिद्र पडून बोटीत पाणी येण्यास सुरुवात झाली. पण प्रसंगावधान राखत त्यावेळी गस्तीवर असलेली पोलीस बोट, ३ स्पीड बोटी व मागून येणारी एक बोट यांच्या मदतीने बोटीतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यात आले असून यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तसेच बोटीच्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री शेख म्हणाले की, गेट वे एलिफंटा प्लेझर्स टुर्स अँड ट्रॅव्हल्स या संस्थेची अलफताह ही प्रवासी बोट ८५ प्रवासी आणि ५ खलाशांसह गेट वे ऑफ इंडिया येथून मांडवा येथे जाण्यासाठी निघाली. सकाळी सव्वादहा ते साडेदहाच्या सुमारास ही बोट मांडवा जेट्टीपासून ५०० मीटर अंतरावर असताना समुद्रातील खडकास आदळल्याने पृष्ठभागाला छिद्र पडून बोटीत पाणी येण्यास सुरुवात झाली.

प्रसंगावधान राखत जवळपास असलेल्या बोटींना मोबाईलद्वारे व हाताने इशारा करण्यात आला. त्यावेळी सागरी गस्त करीत असलेली पोलिसांची सदगुरु ही बोट, ३ स्पीड बोटी व मागून येणारी ओशियन ग्लोरी ही बोट मदतीला आली. पोलीस बोटीवरील कर्मचारी व इतरांच्या मदतीने अपघातग्रस्त बोटीतील सर्व प्रवाशांना सुखरुप किनाऱ्यावर आणण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोटीवरील कागदपत्रांची तपासणी केली असता नोंदणी प्रमाणपत्र, सर्व्हे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे वैध असल्याचे आढळून आले आहे, असे निवेदनाद्वारे मंत्री शेख यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!