Share

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांना विलीगीकरण कक्षात ठेवले जाणार

Published On: 

पुणे : रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत, सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळा, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.

दूध, धान्य, भाजीपाला, किराणा व औषधी अशा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्याबाबतच्या सूचना पणनच्या अधिका-यांसह संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे सांगून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, एन-95 मास्क आणि सर्जिकल मास्क उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. दोन हजार एन-95 मास्क आज प्राप्त होतील. सद्यस्थितीत आवश्यक असलेल्या व भविष्यातील आवश्यकता विचारात घेता अतिरिक्त औषधांचा साठा करण्याबरोबरच औषधींची कमतरता भासणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे व त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण संचालकांशी चर्चा करुन प्रवाशांच्या कॉरंटाइन व्यवस्थेसाठी अतिरिक्त वसतिगृह उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकूण 26 शिक्षण संस्था प्रमुखांशी चर्चा करुन पाच हजारांवर व्यक्तींची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहेत.

अधिक माहिती देताना ते म्हणाले , पुणे, पिंपरी -चिंचवड या ठिकाणी मिळून एकूण 19 करोनाग्रस्त आहेत. शहरातील 1 लाख 74 हजार 235 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!