Share

अबब! औरंगाबादेत अतिवृष्टीने १०० कोटींचे नुकसान

Published On: 

औरंगाबाद : गेल्या काही दिवसात शहरात मोठ्या प्रमाणात संकटांची मालिका सुरू आहे. पावसाने औरंगाबादकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल केले. नाले तुडुंब भरून वाहू लागले. कठडे तुटले, पूल वाहून गेले. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले. त्यामुळे मनपाच्या कामांचा दर्जाही नागरिकांच्या लक्षात आला. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात जवळपास १०४ कोटी ९७ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर नुकसानीची माहिती पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सादर केली. यात रस्त्यांची दुरूस्ती, पुलांची कामे, इमारत दुरूस्ती, नाल्यांची दुरूस्ती या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाल्यांमधून पाणी वाहत असताना संरक्षण भिंती पडल्या, नाल्यात कचरा साचला, रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले, काही भागात रस्ते वाहूनही गेले, रस्त्याची जमीन खरवडून गेली. पुलांचे देखील नुकसान झाले. पालिकेच्या इमारती, आरोग्य केंद्र, पालिकेच्या मालकीचे सामाजिक सभागृह अशा एकूण ८६ कामांचे मोठे नुकसान झाले. पालिकेने तातडीने नुकसानीचा अहवाल अभियंत्याकडून मागवला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा घेतला. या बैठकीत पालिका प्रशासक पांडेय यांनी शहरात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर अहवाल सादर केला. शहरात ८६ कामांसाठी १०४ कोटी ९७ लाख रूपयाच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी राज्य सरकारकडून पालिकेला मिळावा, अशी विनंती पांडेय यांनी केली. शहरातील रस्त्यांना व पुलांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. १४ पुलांच्या दुरूस्तीसाठी १०.७० कोटी आणि १८ रस्त्यांच्या कामांसाठी ६७.२३ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!