पुणे – राज्यासह पुणे जिल्हयात मागील काही आठवड्यापासून म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून येत आहेत.यांच्यावर योग्य ते उपचार विविध ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सुरु आहेत. पण म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची कमतरता भासत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होते.
दरम्यान, आता केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटीक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीने 50 हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिले. पुणे विभागासाठी कंपनीने आज पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, सहायक संचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जेनेरिक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षिरसागर यांनी पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन सुपूर्त केले. येत्या आठवडयात पुणे विभागसाठी आणखी दोन हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन दिलासा देणारे ठरेल असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- स्पर्धा परीक्षेतून निवड झाली परंतु नियुक्त्या रखडल्या; मराठा समाजातील तरूणांचे भवितव्य धोक्यात
- ‘मराठा समाजाला मराठवाड्यात ओबीसीतून आरक्षण द्यावे’, प्रा.प्रदिप सोळंकेंची मागणी
- ‘नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात’, निलेश राणेंचा प्रहार
- ‘वाघाशी मैत्री होत नाही, कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
- कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात ५०० शेतकऱ्यांचा मृत्यू, राहुल गांधींचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

