पुणे : मद्य विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. मद्य खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेचा पुणेकरांनी चांगलाचं लाभ घेतला आहे.
धक्कादायक बातमी ! महाराष्ट्रात जवळपास ९६% स्थलांतरित मजुरांना रेशनचं मिळतं नाही
मंगळवारी पहिल्याच दिवशी पुणेकरांनी हायटेक फंडा वापरत ई टोकन घेतलं. तब्बल 10 हजार 877 पुणेकरांनी ऑनलाईन दारु खरेदीसाठी नोंदणी केली आहे. यामुळे आता दुकानासमोर लागणाऱ्या रांगा देखील कमी होणार आहेत. तर कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती देखील संपणार आहे.
कोरोनामुळे चीनकडून व्यवसाय बदलल्यास भारताला फायदा होईलचं असे नाही: अभिजित बॅनर्जी
मद्यप्रेमींसाठी ई-टोकन सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करुन ई-टोकन घेणे आवश्यक आहे. या उपाययोजनेमुळे मद्यप्रेमींचा रांगेत ताटकळत उभं राहण्याचा त्रास टळणार आहे.
या संकेत स्थळावर ग्राहकाने सुरुवातीला आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर ग्राहकास आपल्या नजीकच्या मद्यविक्री दुकानांची यादी मिळेल. त्यापैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास ई-टोकन मिळणार आहे. त्यानंतर सदर टोकननुसार ग्राहक आपल्या सोईच्या वेळी सबंधित दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.
कोरोनाने केले BSF जवानांना लक्ष्य, 9 जवानांचे कोरोना अहवाल सकरात्मक
दरम्यान मद्य विक्रीवरील बंदी उठवल्यानंतर राज्यातील अनेक मद्य विक्री दुकांनावर गर्दी झाल्याचं पाहिला मिळालं. तळीरामांनी लांबच लांब रांगा लावत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच स्वागत केले . झालेल्या गर्दीमुळे संसर्ग होण्याची भीती वाढू लागल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये दारू विक्री बंद करण्यात आली. मात्र आता ई-टोकन आणून दारू विक्रीस शिस्त आणण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून होत आहे.

