Share

कोरोना व्हायरस वुहानमधूनचं आला असल्याचे आमच्याकडे सबळ पुरावे, अमेरिकेने केला दावा

Published On: 

अंतरराष्ट्रीय : कोरोनाने सर्वाधिक ग्रासलेल्या अमेरिकेने आता कोरोना हा मानव निर्मित व्हायरस असून याची निर्मिती चीननेचं केली असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे विदेश मंत्री माइक पॉम्पियो यांनी हा दावा केला असून पुरावे असल्याचंही म्हंटल आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला. सध्या कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. जगभरातील जवळपास सर्वच देश या जीवघेण्या व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. परंतु, सध्या इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत या व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सतत दावा करत आहेत की, कोरोना हा एक मानवनिर्मित व्हायरस आहे आणि याची उत्पत्ती चीनमधील एका प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.

तर आता ट्रम्प यांच्या सुरात सूर मिसळून माइक पॉम्पियो यांनीही चीनचं कोरोना पसरवण्यास कारणीभूत असल्याचं म्हंटल आहे. ते म्हणाले की, कोरोना व्हायरस चीनच्या कपटीपणाचं फळ आहे. आमच्याकडे हा व्हायरस वुहानमधूनच आला असल्याचे सबळ पुरावेदेखील आहेत. चीनकडे कोरोना थांबवण्याची संधी होती, परंतु त्यांनी मुद्दाम असं केलं नाही.

लक्षात ठेवा जगभरात व्हायरस परवण्यासाठी आणि निन्म स्तरांतील प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी चीनचा फार जुना रेकॉर्ड आहे. चीनमुळे जगभरात व्हायरस पसरण्याची ही पहिली वेळ नाही. गुप्तचर विभाग यासंदर्भात माहिती गोळा करत आहे. याआधीही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात पुरावे असल्याचं सांगितलं आहे, असेही माइक पॉम्पियो म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!