Share

धनश्रीचा डान्स पाहण्यासाठी युजवेंद्रची धडपड : पहा व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्पीनर युजवेंद्र चहलच्या बायकोने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. धनश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नेहमीच सोशल मीडियावर तिचे डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. धनश्री तिच्या उत्तम डान्समुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा या या नव्या व्हिडीओमुळे धनश्री चर्चेत आली आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘बुटी वुर्क’ गाण्यावर धनश्री डान्स करताना पाहायला मिळत आहे. घराच्या गॅलरीत तिने हा जबरदस्त डान्स केला. हा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून तिचा नवरा युजवेंद्र चहल पडद्याआडून होता. पडद्याच्या आडून युजवेंद्रने धनश्रीचा डान्स पाहत होता.

https://www.instagram.com/p/CPNx2lBJ0AK/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओसह धनश्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘जेव्हा तुमचा सर्वोत्तम प्रेक्षक तुमचा डान्स पाहतो, ते म्हणतात ना वर्क फ्रॉम होम… त्याला माझ्या व्हिडीओत दिसायचंय.. आता तुम्हाला समजेल की पाठीमागच्या आणि आताच्या व्हिडीओत काय फरक आहे…’

https://www.instagram.com/p/CPQf8bZpMx5/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, चहलच्या आई बाबांना कोरोनाची बाधा झाली होती तर धनश्रीच्या आई आणि भावाला देखील कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता दोघांच्याही कुटुंबातले सदस्य ठीक आहेत. घरातील सदस्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे युजवेंद्र आणि धनश्रीने सुटकेचा निश्वास सोडलाय. सगळं ठीक झाल्यानंतर पुन्हा एकदा दोघेजण सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!