Share

तुम्ही शिक्षकची उमेदवारी द्या, निवडून आणायची जबाबदारी माझी; सतेज पाटलांनी करून दाखवलं!

Published On: 

🕒 1 min read

पुणे:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरलाय. पुणे शिक्षक मतदार संघातून काँग्रेसला उमेदवारी मिळावी म्हणून पहिल्यापासून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आग्रही होते. तुम्ही फक्त उमेदवार द्या निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहील असेही सतेज पाटील म्हणत होते. काल निकालानंतर सतेज पाटील यांनी आपले शब्द खरे करून दाखवले. शिक्षक मतदार संघातून काँग्रेसचे प्रा.जयंत आसगावकर निवडून आले आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर यांनी विजय मिळवला. आसगावकर हे मूळचे कोल्हापूरचे असून पहिल्यापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. वेगवेगळ्या व्यासपीठांवर शिक्षकांची कामं ते करत असतात. पाच जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकीत जिद्दीनं बाहेर पडल्याचे दिसून आले होते. जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विश्वजित कदम आदी नेत्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला. महाविकास आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई झाली होती.

दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!